
आयफोनने चित्रीत लघुपट “ शोकेस ” ने पटकावला जिल्हापातळीवर द्वितीय क्रमांक
उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रील, डॉक्युमेंटरी आणि शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पुण्यातील जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृहात थाटात पार पडला. यावर्षीच्या स्पर्धेचा मुख्य विषय होता “ स्त्री ”. या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातून “शोकेस” या लघुपटाने द्वितीय क्रमांक पटकावला. या लघुपटाची खासियत म्हणजे यात ना अनुभवी कलाकार होते, ना महागडे तंत्रज्ञान, ना फिल्मी ड्रामा. या उलट संपूर्ण चित्रिकरण हे आयफोन 13 ने करण्यात आले होते. तरीही संपूर्ण राज्यातून आलेल्या ३५० चित्रपटांच्या शर्यतीमध्ये हा लघुपट स्वतःची वेगळी जागा बनवण्यात यशस्वी ठरला. या










